Sanjay Raut PC | अमित शाह हे बनावट शिवसेनेचेही प्रमुख, संजय राऊतांचा भाजप-शिंदेंवर निशाणा ABP Majha
शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात (Shiv Sena UBT Nirdhar Melava) बाळासाहेब ठाकरे यांचं AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं भाषण दाखवण्यात आलं. या AI भाषणात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना-भाजप युती, तसेच नंतर झालेली पक्षफूट यावर भाष्य करताना, "भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेने खांदा दिला, पण स्वतःला निष्ठावंत म्हणवणारेच शेवटी गद्दार ठरले, असे म्हणण्यात आले. या AI भाषणानंतर शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena ) बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबत आहेत, असे म्हणत जोरदार पलटवार केला. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, तंत्रज्ञान पुढे गेले आहे. विज्ञान पुढे गेले आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी AI तंत्रज्ञानाबाबत देश कसा पुढे नेतोय, याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध? अमित शाह यांनी एक बनावट संघटना निर्माण केली. निवडणूक आयोगाला शिवसेना हे नाव द्यायला लावले. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही.